वसमत तालुक्यातील गाजत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक दिनांक 25 डिसेंबर रविवार रोजी मतदान होणार असून तालुक्यातील दोन ठिकाणी हे मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला वसमत व जिल्हा परिषद शाळा कुरुंदा या दोन मतदान केंद्रावर मतदान होणार असून तालुक्यातील एकूण सर्व सहकारी संस्थेतील 3035 मतदार मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत.
या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीठसाठी आमदार राजूूू भैया नवघरे यांचा पॅनल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेश पाटील इंगोले या दोन पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होणार आहे.यात अपक्ष उमेदवार विनोदकुमार झंवर ,लक्ष्मीनारायण मुरक्या,ऋषिकेश देशमुख,बाहेती यांच्यासह काही अपक्ष हे आपलं नशीब आजमावत आहेत.
यासाठी 25 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दोन्हीही मतदान केंद्रावर मतदान होणार असून यासाठी आज मतदान अधिकारी यांचा ताफा मतदान केंद्रावर रवाना झाला आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानदेव डुकरे ,दुधमल,संतोष पतंगे,सोकळवार सह 60 कर्मचारी मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानदेव डुकरे यानी दिली.