कला क्रीडा दूत फाऊंडेशन महाराष्ट्र व लोकहित सोशल वेल्फेअर ट्रस्ट स्वप्नपूर्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देण्यात येतो. प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक पीएसआय बालाजी किरवले यांना मराठवाडा भूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चांद पी.जे. बबनदादा सोरटी, भास्करराव आंबेकर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सदरील पुरस्कार गायत्री लॉन्स आंबड चौफुली जालना या ठिकाणी देण्यात आला. याप्रसंगी अंजानी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या, जाधव दैनिक बदलता संपादक विनोद काळे, वर्गमित्र लक्ष्मण नेवल गुरुजी आणि पीएसआय राकेश नेटके ई.ची उपस्थिती होती.