वसमत शहरात पेट्रोलिंग करत असताना शहर पोलिसांना संशयास्पद जाणाऱ्या दोन इस्मान कडून स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे . याबाबत पुढील कारवाई वसमत शहर पोलीस करत आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 4 मार्च रोजी सांय.6 वा अंदाजे सुमारास शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना कुरूंदा रोडवरील खंदारे पेट्रोल पंपाच्या आलीकडे पुलाजवळ दोन इसम मोटरसायकलवर एका सुती पोत्यांमध्ये जिलेटिनच्या 83 कांड्या
दोन इसम कृष्णा बेले व 21 वर्ष तसेच कृष्णा दत्तराव ढाकरे वय 26 वर्षे दोघेही राहणार कोठारवाडी यांनी जिलेटिन च्या 83 काड्या मॅक्झिन मालक संतोष चव्हाण यांच्याकडून त्यांच्याकडे स्फोटक पदार्थ वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना सदरील स्फोटक हे मानवी जीविताला धोकादायक असल्याचे माहित असून देखील खाजगी वाहनातून विनापरवाना संशयास्पद रित्या संशयास्पद कामासाठी वाहतूक व बेकायदेशीर रित्या स्वतःच्या ताब्यात बाळगत असताना मिळून आल्या यातील इसम नामे संतोष चव्हाण राहणार राजवाडी यांनी स्फोटक वितरणाचे सर्व नियम मोडून त्यांचे उल्लंघन करून ते स्फोटके या कामासाठी त्यातील इसम यांना दिले म्हणून या तिघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहै तसेच या कारवाईत 42320 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे, पोलीस कर्मचारी भगीरथ सवंडकर, पोले यांच्या पथकाने केली आहे.