वीरशैव लिंगायत धर्माचे प्रदेश देवस्थान सिद्धेश्वर मंदिर वसमत येथे ग्रामदैवत श्री संस्थान सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ वसमत येथे पालखी सोहळा चे आयोजन दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे.
हा सोहळा लिंगायत धर्माचे धर्मप्रसार लासीन मठ संस्थानचे विश्वस्त सद्गुरु श्री श्री 108 कर बसव शिवाचार्य महाराज व थोरला मठ संस्थांचे विश्वस्त युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते हा पालखी सोहळा होणार आहे.
हा पालखी सोहळा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थान वसमत सोमवार पेठ येथून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे भव्य दिव्य अशी मिरवणूक परमपूज्य श्री 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत जिल्हा हिंगोली यांच्या अधिपत्याखाली श्रीमंत महाराज थोरावा यांच्या सह अनेक गणाचार्यांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक प्रारंभ होऊन मंगलमय आरती होणार आहे.
तरी सर्व शिवभक्तांनी या भगव्या पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करून घ्यावे असे आवाहन समस्त शिवभक्त विश्वस्त समाज बांधव वसमत यांनी केले आहे. दोन गुरूंच्या सानिध्यात भक्तगणांना आशीर्वाद मिळणार आहे अनेक शिवाचार्य या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे वीरशैव लिंगायत समाज वसमत सह परिसरातीलच नव्हे तर अनेक जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात या पालखी सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.