नंदू परदेशी पुरस्काराने सन्मानित अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते
त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील नंदू परदेशी यांना यंदाचा राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकाररत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती .
महात्मा फुले पत्रकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला मान्यवरांच्या हस्ते 11 हजार रोख व सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले .
दिनांक 17 मे रोजी अहमदनगर येथे संपन्न या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद आमदार राम शिंदे होते तर अहमदनगरचे आमदार संग्राम भैया जगताप, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, संस्थेचे अध्यक्ष, आणि एनटी न्यूज वृत्तवाहिनी संपादक एकबाल शेख या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .