
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील महत्त्वाचा असणाऱ्या पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दिनांक 26 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण 130 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत.
तर काही उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदार संघातून दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांनी सुद्धा आज आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले असून केवळ काही मतदारसंघांमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज ठेवले आहेत.
यामध्ये शिवसेनेचे गटनेते दीपक हळवे यांनी सुद्धा आपली उमेदवारी अर्ज परत घेतला आहे.
यामध्ये दोन पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होणार आहे.
खालील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.