आपला जिल्हा

वसमतमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक नमाज अदा

नागेश चव्हाण प्रतिनिधी

वसमतमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक नमाज अदा

वसमत CT NEWS

वसमत (विशेष प्रतिनिधी नागेश चव्हाण ):

वसमत शहरामध्ये आज ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य ईदगाह मैदान येथे आज सकाळी पवित्र ईद निमित्त शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात विशेष नमाज अदा केली.
यावेळी उपस्थित सर्वांनी देशामध्ये शांतता, बंधुभाव आणि समृद्धी नांदो, यासाठी सामूहिक प्रार्थना (दुआ) केली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
*प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती*
ईद सणाचे औचित्य साधून वसमत शहर आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. या पवित्र प्रसंगी वसमत शहरातील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित होते. उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या पवित्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शहरात सर्वत्र सलोख्याचे आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia