आपला जिल्हाक्राईम स्टोरीसामाजिक
बालाजी किरवले ‘महाराष्ट्र सोशल आयकॉन अवॉर्ड’ ने सन्मानित
रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण
पोलीस दलात कार्यरत राहून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांना कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार,स्मित हरी प्रोडक्शन मुंबई व शामरंजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र सोशल आयकॉन अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

आपल्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या निवडक टिव्ही कलाकार, समाजसेवक, शिक्षक, उद्योजक, साहित्यिक, पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाज सेवेचा वसा घेतलेले उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन ‘महाराष्ट्र सोशल आयकॉन अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
-
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले – झी मराठी टीव्ही, मराठी अभिनेत्री – मेघा घाडगे, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार – प्रभाकर मोरे, सिद्धार्थ गायतोंडे – आर्ट अँड कल्चर प्रोग्राम ऑफिसर गोवा, संतोष रोकडे – प्रकल्प संचालक पु.ल. देशपांडे कला अकादमी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.प्रा. बी.एन.खरात ई. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी किरवले मित्र मंडळ प्रा.सतीश भुयागळे, प्रा.रमेश कुरुडे, नदीम शेख, किरण साळवे, विक्की किरवले आदींची उपस्थिती होती.अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले पोलीस सब इन्स्पेक्टर यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी माहिती सचीव विद्या जाधव यांनी दिली.
याबद्दल किरवले यांचे सर्वस्तरातून कौतुक करून समाज कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.