कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून वाटप सभापती तानाजी भेंडे
वसमत/ रामु चव्हाण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मुख्य प्रशासक पदी सूत्रे हाती घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे पाटील यांनी विविध विकास कामांकडे स्वतः लक्ष देऊन ती प्रामुख्याने सोडवलेली आहे.
यात यार्डात स्वच्छता प्रत्येक पॉईंटवर कचराकुंडी त्याचबरोबर रस्ता. वृक्षारोपण आदी कामे तानाजी बेंडे यांनी केले असून नुकतेच कोरोणा सारख्या महामारी मध्ये कर्मचाऱ्यांनी शेतीमालाची आवक, लिलाव वजन काटे यांचे नियोजनबद्ध कामकाज करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला यामुळे संस्थेचे उत्पन्न वाढ होऊन या मुळे संस्थेला फायदा झाल्याने मुख्य प्रशासक तानाजी बेंडे पाटील व प्रशासकीय सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून सहा लाख 56 हजार 352 रुपये दिल्याने कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रशासक तानाजी बेंडे यांच्यासह प्रशासकीय मंडळाचे आभार मानले आहे.