
वसमत / रामु चव्हाण
आता माघार नाही..! राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार, मराठा आरक्षणासाठी ग्रामीण भागात राजकीय पुढाऱ्यांना जो पर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावबंदी व निवडणुकांवर बहिष्कार टाकत आहे.
ग्रामीण भागा नंतर आता वसमत शहरातील मराठा समाजाचा गढ असलेल्या शहरपेठ भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरपेठ येथील सर्वच राजकीय पुढाऱ्यांन प्रवेश बंदी केली आहे.
आज शहरपेठ येथील मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन यात शहरपेठ येथील सार्वजनिक,सामाजिक व इतर कुठल्याही कार्यक्रमास राजकीय पुढाऱ्यांन येऊ नये …आल्यास त्यास सर्वस्वी स्वतः जबाबदार रहाल असे पत्रक काढले आहे.
त्यामुळे मराठवाडय़ातील पहिले वसमत शहर हे गाव असेल तिथे सर्वच राजकीय पुढाऱ्यांन प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजानी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली असुन जर मराठा आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असे ही सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.