7 डिसेंबर रोजी डिग्रस क-हाळे येथे होणा-या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार हयातनगर सर्कल मधील मराठा समाज बांधवांनी केला.
हयातनगर येथे सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत हयात नगर सर्कलमधील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सर्व समाजाने हयात नगर सर्कल येथून जास्तीत जास्त संख्येने सात डिसेंबर रोजी होत असलेल्या दिग्रस क-हाळे येथील सभेसाठी मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले यामुळे सात डिसेंबरचा विराट मेळाव्यासाठी हयात नगर सर्कल येथील मराठा समाज बांधव कामाला लागले असून हात नगर सर्कल येथून मोठ्या संख्येने सभेला जाणार असल्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरले.