आपला जिल्हाराजकीयसामाजिक

शिवसेनेची च्या इशाऱ्याने अवघ्या 15 तासांत वसमत येथील खड्डे बुजवण्यास सुरुवात

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरातुन जाणाऱ्या नॅशनल हायवे या हायवे दरम्यान शहरातील रहदारीचे ठिकाण असलेल्या गवळी मारुती मंदिर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय आहे याच कार्यालयाच्या बाहेर एक मोठा खड्डा असल्याने या खड्ड्यांमधून जाताना अनेक वाहनधारकांचा अपघात होऊन जखमे होत आहेत .तसेच या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा दिसत नसल्याने अनेक विद्यार्थी या खड्ड्यात वाहने अडकून पडत आहेत या ठिकाणाहून अवजड वाहने या ठिकाणाहून जात असतात दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडू नये यासाठी लक्ष देणे गरजेचे असताना कोणीही लक्ष देत नव्हते यावेळेस शिवसेनेचा वतीने या खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी केली आहे तसेच येत्या दोन दिवसात हा खड्डा न बुजवल्यास सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना बेशरमाच्या फुलाचा हार घालण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी दिला होता अवघ्या 15 तासाचा आत नॅशनल हायवे वरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत तर काही खड्डे बुजविण्यात येत आहेत.
यामुळे नागरिक विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!