आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र
वसमत च्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात 50 फुटी रावणाचे होणार दहण
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्याचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव गेली 48 वर्षापासून अखंडितपणे सुरू असून हा दसरा पाहण्यासाठी नांदेड परभणी हिंगोली सह इतर जिल्ह्यातून नागरिक मोठ्या प्रमाणावर वसमत येथे येत असतात दरवर्षी दसरा महोत्सव समितीमध्ये
कृषी प्रदर्शने, पशुप्रदर्शन ,कुस्ती स्पर्धा
यासह विविध स्पर्धा प्रदर्शने आयोजित करण्यात येतो.परंतु गेली तीनन वर्षांपासुन कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे सार्वजनिक दसरा महोत्सव प्रदर्शनी रद्द झाला होता पण आता शासनाने सर्व सणांचा निर्बंध मुक्त केल्याने यावर्षीचा सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार असून सार्वजनिक दसरा महोत्सव समिती वसमतच्या वतीने विश्वस्त मंडळाने घेतला असून यावर्षी प्रदर्शनास कृषी प्रदर्शन ,पशुप्रदर्शन कुस्ती स्पर्धा या आयोजित केल्या आहेत .तर नवरात्री मधील धार्मिक उत्सव देवीची स्थापना आरती व 5 ऑक्टोबर रोजी दसरा या दिवशी रात्री ठीक 11-30 वाजता 50 फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन व गफुरभाई यांची फटाक्याची आतिषबाजी व रोषणाई पहावयास मिळणार असल्याचे श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार यानी वसमत सिटी न्यूज शी बोलताना सांगितले. यावेळी श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे विश्वस्त शिवदासजी बोड्डेवार,नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार ,गणेशराव काळे,शिवाजीराव अलडिंगे सह विश्वस्त उपस्थित होते.
यासाठी शिवदासजी बोड्डेवार,नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार ,सुनिल भाऊ काळे ,सिताराम म्यानेवार, गणेशराव काळे,शिवाजीराव अलडिंगे,काशिनाथ भोसले,कन्हैया बाहेती सह विश्वस्त परिश्रम घेत आहेत.