विद्यार्थीच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे या अनुषंगाने शहरातील नावा रुपाला येत असलेल्या गुरुदेव इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात आज दि 10 मार्च रोजी सायंकाळी 6:00 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव 2025 मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री विष्णुकांत नवघरे (युवा उद्योजक), हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधीं नर्सिंग काॅलेज वसमत चे संस्थापक अध्यक्ष प्रा. रमेश मानवते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर बालक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्रुष्णा देशमुख,महाराष्ट्र अर्बन को. बॅंकेचे संस्थापक श्री रवि भुसावळ, महाराष्ट्र अर्बन को बॅंकेचे व्यवस्थापक श्री संदिप सुर्यवंशी, हे होते.या वेळी गुरुदेवां इंग्लिश स्कूलचे संस्थापकअध्यक्ष राजकिरण बोगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या प्राचार्य देविका बोगेवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .शाळेत विद्यार्थ्यांना सिस्थ लागावी व पालकांनी आपल्या मुलांनकडे हि कसे लक्ष ठेवावे या हेतूने गुरुदेवा इंग्लिश स्कूल ने एक अनोखा उपक्रम राबवला आहे ज्यात पालकांनी मुलांचा होमवर्क,पाहने,प्रतेक पालक सभेला उपस्थित राहणे, प्रगती तपासने हे केले पाहिजे जेने करून आपल्याला आपल्या मुलांन विषयी माहिती मिळते व मुलही लक्ष ठेवतात त्या माध्यमातून शाळा व पालक एकमेकांच्या संपर्कात राहतील व वैचारिक देवान घेवाण वाढेल असा मानस आहे. चिमुकल्यानी अनेक गाण्यावर न्रुत्य सादर केला तर पालकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.
संस्थापक अध्यक्ष राजकिरण बोगेवार यांनी मार्गदर्शन केले या वर्षी पासून शाळेत वर्ग 4 थी सुरू करणार असून तुमच्या पाल्यांना आता नांदेड,परभणी जाण्याची वेळ येणार नाही व अल्प दरात दर्जेदार शिक्षण मी तुम्हांला आपल्या शहरात देतो असे हि या वेळी ते म्हणाले .विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन भारत क्यादलवार सर,वैष्णवी टोंपे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील खंदारे मॅडम,जाधव मॅडम,बोंगाने मॅडम,गोडघासे मॅडम,पुजा जाधव मॅडम,श्रीरामवार मॅडम,दुमाने मॅडम,नादरे मॅडम ,शिवानी साळवे मॅडम,आडेपवार मावशी, जना मावशी यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य देविका बोगेवार मॅडम यांनी केले या वेळी विद्यार्थी, पालक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.