आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगोलीचे अनिल जाधव यांना राज्यस्तरीय ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान

संपादक हरनामसिंग चव्हाण

हिंगोलीचे अनिल जाधव यांना राज्यस्तरीय ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान

वसमत CT NEWS

मुंबई:
हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गंगाराम जाधव यांना सन २०२३-२४ चा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित भव्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
जाधव यांनी शेतीत केलेल्या आधुनिक, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या यशाबद्दल हिंगोली जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!