शिवसेनेचे खासदार तथा नेते संजय राऊत यांना गेले शंभर दिवस ईडने बेकायदेशीर रित्या अटक करून तुरुंगात ठेवले होते यावर आज न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढत त्यांची जामीनवर मुक्तता केली.
त्याना जामीन मिळताच वसमत शहर प्रमुख काशिनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून यावेळी जल्लोष करण्यात आला. यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, खासदार संजय राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या यावेळी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते