श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
सहावा दिवस
व्याख्याते सैंगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून ,प्रवचनाला सुरवात करण्यात आली.आजच्या सत्संगात गुरुची महती सांगण्यात आली की गुरू कोणाला म्हणावे किंवा कोणाला मानावे,साधारण गोष्टीचे शिक्षण देणाऱ्या व्यक्तीला ही गुरू मानावे असे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या भक्तांना निमित्त करून अखिल मानव जातीला उपदेश केलेला आहे. तसेच भगवंतांची पूजन कसे करावे याची माहिती आज सर्वांना दिली.तसेच विधी आणि भाव यातील फरक स्पष्ट करून सांगितला. व मनुष्याने निर्मळ भावाने धार्मिक क्रिया करावी असे त्यांनी सांगितले. जर भाव,आवडी,आपुलकी नसेल तर केलेली क्रिया कार्य हे व्यर्थ असा उपदेश आज उपस्थित असलेल्या सर्व श्रोतावर्गाला केला.. व लीळाचरित्र या मराठीआद्य ग्रंथातील भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची शिष्या आऊसा थाळनेरकर यांची माहिती सांगितली आणि श्री कृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे पाचवे सत्र संपन्न झाले.
वकार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)