वसमत तालुक्यातील प्रसिद्ध पुरोहित अमोघ विनायक महाराज वय 36 वर्ष रा.ब्राह्मण गल्ली वसमत यांच्यावर खंजीर ने हल्ला करून जखमी केल्याची घटना वसमत शहरामध्ये दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वा घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पुरोहित अमोघ विनायक महाराज व त्यांचे कुटुंबीय दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शुकानंद मठ संस्थान येथे पुजा करण्यासाठी गेले असता यातील आरोपीत प्रदीप देशपांडे, पूजा देशपांडे, चंद्रशेखर जोशी ,पियुष जोशी उर्फ स्वानंद महाराज ,उमेश जोशी, अनिरुद्ध जोशी, महेंद्र कुलकर्णी, भावना जोशी, नारायणराव शिरडोनकर, बाबुराव कुलकर्णी यांनी गैर कायद्याची मंडळी जमून यातील फिर्यादी साक्षीदार यांना तुम्ही येथे पूजा का करता तुमचा काय अधिकार आहे असे म्हणून या आरोपी क्रमांक एक ने अमोघ महाराज यांच्या वर खंजीर ने पायावर मारून दुखापत केली तसेच साक्षीदार यांनादेखील काठीने मारून दुखापत केली वरील सर्व आरोपीत यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना तुम्हाला खतम करून टाकतो , जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली अशा आशयाची तक्रार पुरोहित अमोघ विनायक महाराज यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात दिली असून यावरून वरील दहा आरोपीतान विरुद्ध वसमत शहर पोलीस स्थानकात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महिपाळे हे करत आहेत.