वसमत विधानसभा मतदारसंघाच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तुरा….
आमदार राजुभैया नवघरे आता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार…
वसमत/ रामु चव्हाण
आमदार राजुभैया नवघरे यांचा बाजार समिती व कारखाना क्षेत्रातील अनुभव प्रदीर्घ असुन ते या क्षेत्रात कमी वयात नावारूपाला व यशस्वी झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तसेच बँकिंग सहकार क्षेत्रातही त्यांचा अनुभव दांडगा आहे. राजकिय व सहकार क्षेत्रात 13 वेळेस विजयाचा गुलाल लावुन त्यांनी अगदी कमी वयात आपली छाप उमटवली आहे.
त्यांचा हा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) या राष्ट्रीय पातळीवरील संघात सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे.
या संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील उणीवा दुर करुन या क्षेत्राला प्रबळ बनवणे तसेच युवांना प्रेरित करून सहकार क्षेत्रात युवांचे नेतृव वाढवणे व या क्षेत्रात नवीन अनुभवी नेतृत्वाची उभारणी करणे. आशा इतरही महत्वपूर्ण उद्दिष्टे पूर्तीसाठी प्रयत्नशील असणे हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे.
राष्ट्रीय पातळीवर आमदार राजुभैया नवघरे यांना सदस्यत्व मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.