ताज्या घडामोडी

वसमत येथे लिफ्ट देणा-याची सिनेस्टाईलने स्कुटी चोरट्याने पळवली

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

आपण एखाद्या चित्रपटामध्ये लिफ्ट देणाऱ्या ची मोटरसायकल ज्याप्रमाणे चोर पळवतो त्याचप्रमाणे वसमत शहरात सुद्धा चोरट्यांनी चक्क लिफ्ट देणाऱ्याची स्कुटी पळवली आहे.
वसमत शहरातील आंबेडकर मार्केट येथील कोसलगे किराणा असलेले शशिकांत कोसलगे यांचा मुलगा गणेश कोसलगे हा दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्या च्या सुमारास कबुतरखाना रेल्वेस्टेशन रोड वसमत पासून TVS ची स्कुटी MH -38 N-0210 ने ग्रे कलरची
जात असताना एका इसमाने त्यास रेल्वेस्टेशन जवळ सोडण्याची विनंती केली यावेळी गणेश कोसलगे यांनी त्यास रेल्वे स्टेशन जवळ चौकामध्ये सोडले असता कोसलगे हे लघुशंका करण्यासाठी उतरले असता चक्क त्या इसमाने स्कुटी घेऊन तेथून धूम ठोकली. या बाबत गणेश कोसलगे यानी आरडाओरड केली तो पर्यंत तो इसम स्कूटी घेऊन परत याच रोडने पळाला असल्याची गणेश कोसलगे नी सांगितले . सदरील प्रकार घरी सांगितल्यानंतर बराच वेळ त्यांनी शोधाशोध केला पण सदरील स्कुटी घेऊन चोरटा फरार झाला होता.तो मिळाल  नाही याबाबत आज तीन ऑगस्ट रोजी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी सदरील गणेश कोसलगे दाखल झाले असून यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.
सदर स्कुटी कुणास दिसल्यास मो.क्र.9527944694,8983 323227 वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!