वसमत (प्रतिनिधी): येथील सहकार सागर दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन दिनांक 7 जानेवारी शनिवार रोजी दुपारी 12 वाजता साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रल्हाद काळे, जयराम जाधव पाटील म्हतारगांवकर, शेतकरी संघटनेचे गोरख पाटील, शमीम सिद्दीकी, शेख इमामोद्दीन (संपादक गौरव युवा), अ.सईद फारुकी (संपादक : प्रभात किरण), नविद अहेमद (पत्रकार) सय्यद लाल अली, स.अशरफ अली, शफ़ीउल्ला खान (उद्योजक : स्टार इलेकट्रोड वेल्डींग रॊड प्रा.लि.वसमत), शेख जमील (भारत प्रेस), सहकार सागरचे मुख्य संपादक के.यु.अली, उपसंपादक सय्यद काज़म अली, कार्य.संपादक समीर अजमल,सोहेल अली व आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिति होती
मागील 10 वर्षापासून सहकार सागर दिनदर्शिकेचे प्रकाशीत करण्यात येत असून प्रकाशनाचे हे 11 वे वर्ष आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य के.यु.अली सहकार सागर च्या माध्यमातुन करीत आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचाली बद्दल मा. जयप्रकाश दांडेगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.