आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय
गोदावरी अर्बन वसमत शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण
गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑप सोसायटीच्या वसमत येथील शाखेच्या यशस्वी ५ व्या वर्धापन दिनानिमित्त वसमत येथे आयोजन गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . दि. ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता वसमत शाखेच्या प्रांगणात शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये शिबिराला सुरवात होणार असून याकरिता डॉ. सौ. सुधा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
गोदावरी अर्बन सहकाराबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उस्फुर्तपणे सहभाग घेऊन कार्य करत असते . आरोग्याच्या बाबतीत गोदावरी अर्बनने प्रामुख्याने आघाडीवर राहून शिबिरांचे आयोजन केले आहे . रक्तदान शिबीर , मोफत नेत्र तपासणी , महिला आरोग्य शिबीर , अश्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे . याच अनुषंगाने गोदावरी परिवारावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांचे आरोग्य सुद्धा ठणठणित राहावे या उद्देशाने वसमत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे . गोदावरी अर्बनने देशातल्या पाच राज्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून ८०च्या वर शाखांमधून आर्थिक व्यवहार केले जातात. ज्या भागात कार्यभार आहे त्या भागातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अश्या शिबिरांचे आयोजन करण्यात येते हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील शाखेला यशस्वीपणे ५ वर्ष पूर्ण झाले असून ६ व्य वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या आरोग्य शिबिरात सर्व आजारांच्या मोफत तपासण्या, शुगर ( मधुमेह ) , बीपी, जनरल सर्व तपासणी तज्ञ डॉक्टर सौ . सुधा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून या मोफत शिबिराचा तालुक्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी अर्बन वसमत शाखेच्या वतीने करण्यात आले आहे . शिबिराला गोदावरी अर्बन वसमत शाखेचे अशोक चोपडे, संगिता नाकोड, रामदास गोंदेस्वार, जगन्नाथ खराटे, धनंजय देशमुख, राहुल सूर्यवंशी, राजकुमार कापुरे, प्रवीण जाधव, नागनाथ आंबोरे यांच्यामार्फ़त रुग्णांची विशेष काळजी घेतली जाणार आहे .