आपला जिल्हासामाजिक

अदभूत,नेत्रदीपक, आणि वारकरी संप्रदायाच्या वातावरणात गिरगांव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा

रामु चव्हाण

*अठरा पगड जातीला सामावून घेणारा सोहळा* हभप सोपान महाराज

वसमत /

१९ फेब्रुवारी म्हटले की हृदयात एकच नाव घिरट्या घालते,ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करणे, संबंध राज्य देश व परदेशात देखील शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो आजही ३५० वर्षे झाली पण रयतेच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज वास करत आहेत.

वसमत तालुक्यातील गिरगांव या मोठ्या गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, येथील महारुद्र नगर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या मुहूर्तावर हा सोहळा १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव साजरा करून या सप्ताहाची प्रत्येक वर्षी सांगता करण्यात येते.
या हि वर्षी कोरोनाचे संकट उभे असतांना सर्व प्रशासकीय नियम पाळत हा सोहळा संपन्न झाला, १२ फेब्रुवारीच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या भागवत कथा प्रारंभ झाली होती, रोज महाराष्ट्र राज्यातील नामवंत किर्तनकार यांनी आपली हरी किर्तन सेवा समर्पित केली, सात दिवस या कथेचा सार हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप यांनी आपल्या अमृतवाणीतून श्रोत्यांना सांगुन धर्म ज्ञान प्रसारीत केले.
१९ फेब्रुवारीच्या सकाळी सकाळी गिरगांव नगरीत दारोदार तोरणे, सडा, रांगोळ्या, दिव्यांची आरास, विद्यूत रोषणाई, भगवे फेटे, विविध वेषभूषा परिधान करून तरुण अबाल वृद्ध महिला यांनी शिवजन्मोत्सव मिरवणुकीत सहभाग घेतला.
वारकरी संप्रदायाचे टाळकरी, विणेकरी, भालदार, चोपदार, पखवाज, मृदुंग,ढोल,तासे,यांच्या गजरात निगलेली मिरवणूक हि सर्व गावाला वेढा देत उपस्थित सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल असे नेत्रदीपक, अदभुत, मनमोहक, आणि आकर्षक असे सजीव देखाव्याने सजलेले रस्ते असे कि जणु भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या पंढरीत आहोत असी अनुभूती उपस्थित शिवप्रेमींना वाटत होती.
या मिरवणुकीत अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हा सोहळा साजरा केला हा सोहळा याची देही याची डोळा बघण्याचे सौभाग्य लाभले अशी भावना भागवत कथाकार हभप सोपान महाराज सानप यांनी व्यक्त केली.
दुपारच्या सत्रात हभप सोपान महाराज यांनी काल्याचे किर्तन करतांना शिवजन्मोत्सव जन्मोत्सव का साजरा करावा याचे महत्त्व लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न केला.
या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजन्मोत्सव सोहळ्यात सर्व नागरिक, महिला,लोकप्रतिनिधी, कर्मचारी, यांनी उपस्थित राहुन हा देयदीप्य शिवजयंती उत्सव साजरा केला.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आयोजकांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेषतः हा शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी गिरगावच्या पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी देखील उपस्थित राहुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!