वसमत शहरातील सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला आज तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला.
वसमत शहरात 15 ते 18 वयोगटातील तरूणांचे व नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरू असून या ठिकाणी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी भेट देऊन आढावा घेतला तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत सूचना दिल्या . शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेण्याबाबत सूचना केल्या.तसेच 15 ते 18 वयोगटातील लसीकरण युद्ध पातळीवर राबवणार असल्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिलकेवार , वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
काही लसीकरण केंद्रावर अतिरिक्त वैद्यकीय पथक नियुक्ती देण्याबाबत संबधीत यंत्रणेस सुचना दिल्या आहेत.