आपला जिल्हाक्राईम स्टोरी
विद्या नगर येथील महिलेचे गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरातील विद्या नगर येथे राहणाऱ्या रेवती रेणुकादास देशपांडे यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट अज्ञात दोन इसमांनी मोटरसायकल वर येऊन हिसकावून नेल्याची घटना वसमत शहरात घडली .

वसमत शहरातील ब्राह्मण गल्लीतील रहिवासी श्रीमती रेवती देशपांडे या सध्या विद्यानगर येथे आपल्या मोठा मुलगा यांच्याकडे राहत असून दररोज नियमितपणे त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात.आज ही त्या दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात बसले असताना दोन मोटरसायकलवर इसम त्या ठिकाणी आले व रेवती देशपांडे यांना खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट अंदाजे 18 ग्राम हिसका देऊन मोटरसायकलवर पळ काढल्याची घटना वसमत शहरात दोन फेब्रुवारी रोजी घडली .या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या सह शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी दाखल झाले असून नाकाबंदी करण्यात आली असून चोरट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.
Basmath police Hingoli police