वसमत प येथील लेखणीच्या माध्यमातून समाजकारण करणारे रात्री-अपरात्री गोरगरिबांच्या कामी येणारे गोरगरीब सामान्य जनतेचे पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्न सोडवून सदैव तत्पर राहणारे वसमत येथील मनमिळावू ज्येष्ठ पत्रकार मोईन कादरी यांनी कारखाना रोड लकी हॉटेल समोरील रस्ता हा अपघात ठिकाण बनला होता. मागील काही दिवसांपूर्वी उसाने भरलेल्या डबल ट्रॉली ट्रॅक्टर पलटी होऊन मोठा अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याची दखल घेत त्यांनी बातमी लावली व सदरील बाब वसमत उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली व रस्ता दुरुस्त करून देण्याचा आग्रह केला यांच्या मागणीला प्रतिसाद देत वसमत येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी श्री सचिन खल्लाळ साहेबांनी स्वतः अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली व सदरील गुत्तेदारास रस्ता दुरुस्त करून देण्याचे आदेश दिले व रस्ता तात्काळ करण्यात आला पत्रकार कादरी यांच्या मुळे कारखाना रोड येथील रस्ता दुरुस्त करून देण्यात आला हे विशेष मोईनकादरी यांच्या कारखाना रोड येथील लकी हॉटेल चे मालक शेख जब्बार व तेथील नागरिकांनी मोईन कादरी यांचा सत्कार केला यावेळी दलित श्रावणे, शमीम सिद्दिकी, रशीद अमजद, पठाण नवीन, अहमद इर्शाद पठाण ,शेख हरून, आयुब पठाण आदींची उपस्थिती होती