वसमत पालिकेचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात तब्बल २२ महिन्यानंतर बुधवारी ता. ८ रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
वसमत येथील एका महिलेने बुधवारी ता. ८ वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष सिताराम गणपत म्यानेवार यांनी ता. ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजता घरातील दुकानात प्रवेश करून विनयभंग केला. तसेच या प्रकरणात साक्षीदारास शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. यावरून वसमत शहर पोलिसांनी सिताराम म्यानेवार याच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करीत आहेत.
या संदर्भात म्यानेवार यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा राजकिय षडयंत्र असल्याचे पालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करून आपली प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार यानी सांगितले.
तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी उपनगराध्यक्ष सिताराम मान्येवार यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून यामध्ये राजकीय षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे तसेच तब्बल 22 ते 23 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्रातुन हा गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा दाखल करण्या मागे षड्यंत्र असून निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करणे म्हणजे राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करणे उचित होते पण तसे न करता पोलिसांनी गुन्हा दाखल करणे हे चुकीची बाब असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तरी सदरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी केली आहे