विश्व हिंदू परिषद व दुर्गावाहिनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दिले निवेदन
वसमत/ रामु चव्हाण
दिल्ली येथे लव जिहाद प्रकरणातून हत्या झालेल्या कु श्रद्धा हिला आपल्या जीव गमावा लागला या घटनेचा निषेध करत वसमत तेथे विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी महिला विभागाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देऊन आंतरधर्मीय विवाह व लवजिहादवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिल्ली येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आम्हीच दाखवून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाने लग्नाची मागणी करताच घरातच तिच्या शरीराचे क्रूर पद्धतीने 35 तुकडे करून मोठ्या फ्रिजमध्ये त्यांनी ठेवले होते सहा महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला असून या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. श्रध्दा सारख्या हजारो निष्पाप मुली या अशा लव जिहाद प्रकरणात अडकून कुरूपपणे चिरडल्या जाता आहेत.
आतापर्यंत हजारो हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याबरोबर बळजबरीने लग्न करून आणि छळ करणे हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. याप्रकरणी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी संभाजीनगरला शिल्लेखान चौकात सय्यद अकबर या रिक्षावाल्याने ट्युशनला जाण्यासाठी त्याचा रिक्षात बसलेल्या मुलींची छेड काढली त्या मुलीने जिव वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली याहून अशा नराधमांना कायद्याची भीती नसल्याचे दिसून येत आहे यामुळे सदरील कायदा कडक करत अशा घटना भविष्यात घडू नये यामुळे आंतरधर्मीय विवाह आणि लव जिहादवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद ,दुर्गा वाहिनी महिला विभाग वसमत च्या वतीने मोर्चा काढत देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे या निवेदनावर अरुणा तोरेवार, गोदावरी पटवे ,सुषमा बोड्डेवार,ररेखा मॅनेवार,कल्पना चामलवार, विजयालक्ष्मी खपले, सुनिता पारवे, लता तोष्णीवाल, शोभा उदावंत, रूपाली वैजवाडे, इंदुबाई सुपेकर, जयश्री लक्कमवार, सावित्री वाघमारे, निकिता गुडेवार ,स्वरूपा गुडेवार, मीरा दिंडुरकर ,अंजली महाराज, गीतांजली बोल्लेवार, मुक्ता बोललेवार ,जयश्री महाजन, राजश्री मेहेत्रे, शारदा कोमलवार, ममता ताटेवार, कविता बोखारे,अरुणा वडीपल्ली ,अर्चना तमखाने ,ज्योती बोखारे ,रेखा पातुरकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.