
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर
वसमत /रामु चव्हाण
कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याबाबत आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत
याबाबत दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत नाम निर्देशन पत्र विक्री व दाखल करणे
नामनिर्देशन पत्राचा प्रसिद्ध दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर
24 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी
विधीग्राह्य नामनिर्देशन पत्र सूची प्रसिद्ध करण्याची तारीख 25 नोव्हेंबर
नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022
पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 12 डिसेंबर 2022
तर 25 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे
मतमोजणीसाठी दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे