मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख व त्यांचे कुटुंबीय उद्या वसमत येथे दाखल होणार असून त्यांच्या स्वागतासाठी सकाळी शिवतीर्थ ते जिल्हा परिषद मैदान अशी भव्य मोटरसायकलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत येथे दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य अशी जयंती साजरी करण्यात येते त्या निमित्ताने राजा शिवछत्रपती राष्ट्रीय पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील काम करणा-याना हा पुरस्कार दिला जातो.
या वर्षी मस्साजोगचे उत्कृष्ट प्रशासन कौशल्य निपुन आर्दश सरपंच म्हणून कामकरणारे दिवंगत सरपंच स्व संतोष देशमुख याना या वर्षीचा राजा शिवछत्रपती राष्ट्रीय प्रबोधनकार पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्या निमित्ताने दि.28 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारी साय.5 वा स्व संतोष देशमुख यांचे कुटुंबीय वसमत ला दाखल होणार असून शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजीमहाराज याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.ही रॅली शिवतीर्थ ते जिल्हा परिषद मैदान अशी येणार आहे.तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी मोटरसायकल रॅलीत सहभागि व्हावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती वसमतचा वतीने करण्यात आले आहे