आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी वसमत बंदची महाविकास आघाडीची हाक

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक 10,10,2021,रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने दि ११ आक्टों सोमवार महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा एकाकी नाही हा विश्वास देण्यासाठी व उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी आपन सर्वजण यात सहभागी ह्वावे यासाठी शासकीय विश्रामगृहात वसमत येथे महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाची बैठक संपन्न झाली.

   या बैठकिस आमदार राजूभैय्या नवघरे,माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब, माजी आ.पंडीतराव देशमुख, श्रीनिवास पोराजवार, अब्दुल हाफिज अ.रहेमान, सुनिल भाऊ काळे,मुनीर पटेल, डॉ.क्यातमवार, त्र्यंबक कदम,अंबादास भोसले,अजगर पटेल,आयुब पॉप्युलर, तानाजी बेंडे, श, नवीन चोकडा, सुभाष लालपोतू, सौरव जाधव,जीजामामा हरणे,बालुमामा ढोरे, प्रशांत शिंदे, गजानन ढोरे, दिलीप सोनटक्के ,गणेश कमळू ,प्रकाश इंगळे आ दी महाविकास आघाडी व व्यापारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी मार्गदर्शन करताना आ.राजुभैय्या नवघरे यांनी उद्या ठिक ११ वा.झेंडा चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले..

छाया नागेश चव्हाण वसमत🙏🏻👇🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!