महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना शाखा वसमत च्या वतीने उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्यामार्फत ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की, मिटर रेडींग कायमस्वरूपी वायरमन किंवा कारकून यांनीच मीटर रीडिंग घ्यावी गुत्तेदारच्या खाजगी कर्मचाऱ्या मार्फत घेण्यात येऊ नये मिटर रिडींग घेतल्यावर किती युनिट वापरले हे मीटर धारकाला दाखवावे किंवा तोंडी सांगावे व रीडिंगची एक पोहोच पावती द्यावी आणि त्याची नोंद त्या कार्डावर करावी खाजगी गुत्तेदारचे कर्मचारी कर्मचारी अंदाजे कमी किंवा जादा रीडिंग घेतात कधी तर रिडींग न घेता उपलब्ध नाही असे बिलावर लिहून येते यामुळे वीज ग्राहक व जनतेला याचा त्रास होतो खाजगी कर्मचारी यांना काही प्रशासनाची भीती नसते किंवा त्यांना झालेल्या चुकीची शिक्षा, मेमो, चार्जशीट मिळत नाही ते चूक करून जनतेच्या गळ्यात घालतात आता वसमत शहरात हजारो लोकांना वापर कमी ज्यादा बिल आले कित्येक लोकांना ज्यादा वापर कमी बिल आले याची शहानिशा कंपनी करीत नाही रीडिंग घेणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मीटर धारकांना वीज वितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी ग्राहकांवर लक्ष देत नाही या सर्व बाबी टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने मीटर जवळ कंपनीचा एक कार्ड लावण्यात यावा त्यावर घेतलेली रीडिंग लिहिण्यात यावी असे मागणीचे निवेदन वसमत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ पतंगे, उपाध्यक्ष मुबीन सिद्दीकी, देवानंद सोनाळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.