आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करा अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा- कन्हैया बाहेती

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

महाराष्ट्रात दररोज पेट्रोल डिझेल गॅस दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असून दरवाढीच्या युवा सेनेच्या वतीने आज जाहीर निषेध करत वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला येथून बैलगाडी सायकल मोर्चा काढण्यात आला.


दररोज इंधन वाढ होत असल्याने आणि जीवन पूर्ण विस्कळीत झाले असून दळणवळणाची व्यवस्था सुद्धा विस्कळित झाली आहे तसेच गॅसचे दर सुद्धा वाढत असून यामुळे नागरिक आर्थिक भुर्दंड आणि संस्थेच्या काळात सोसावा लागत आहे अगोदरच कोरोना महामारी रोजगार गमावलेल्या सामान्य नागरिकांना गॅसची दरवाढ झाल्यामुळे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी या दरवाढीच्या केंद्र शासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील इंधन वाढ तात्काळ कमी करावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी दिला आहे .


वसमत विधानसभा युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारने अवास्तव वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवासेना सहसचिव अजय भैया मुंदडा, युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया भैया बाहेती, यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, युवा सेना विस्तारक अभिषेक शिर्के, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील, माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा , हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष दादा बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सायकल व बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे,राजू चापके,तालुका प्रमुख अंकुश आहेर, विधानसभा अध्यक्ष संभाजी बेले, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,शहर प्रमुख काशिनाथ भोसले,नगरसेवक धनंजय गोरे,डाॅ पार्डीकर,अनिल कदम, शंकर कदम, शहरप्रमुख धीरज कुल्थे, शहर सचिव अजय सिंग चव्हाण, शहर उपप्रमुख काशिनाथ भोपे, नितीन कदम, शहर संघटक सचिन कटेकर, महिला आघाडीच्या रेणुकाताई पतंगे, उमाताई गीते, बाजीराव सवंडकर,तानाजी कदम,बाबा अफुणे,भिमराव भोसले,राजेश भोसले,राजेश पवार,दत्तरामजी इंगोले,अभय जैन,राजेश क्षीरसागर,राजु बोखारे, शिवसेनेचे आणि युवा सेनेचे सर्व आजी माजी अधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!