आज कुरुंदा येथे डॉक्टर असोसिएशन तर्फे सामुदायिक धनवंतरी जयंती साजरी करण्यात आली व कोरोनारुपी राक्षसाचा नायनाट होऊन सर्वाना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ कैलास बारे , मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दासरे , शिवसेना उपतालुका प्रमुख विश्वनाथराव दळवी पाटील , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नामदेवराव दळवी , लोकमत चे पत्रकार इब्राहिम जहागीरदार , कुरुंदा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजीराव काळे , डॉ असोसिएशचे सदस्य डॉ प्रीतिताई दळवी व डॉ प्रभाकर दळवी यांच्या हस्ते भगवान धनवंतरी चे यथोचित पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर जाधव के एच , डॉक्टर , डॉ गजानन कुबडे , डॉक्टर प्रतिक मोकाट ,डॉक्टर नीलकंठ देशमुख सेलूकर , डॉक्टर अतुल जगताप ,डॉक्टर सुमित नादरे ,यांच्यासह सर्व डॉक्टर व मेडिकल बांधव उपस्थित होते . *धन्वंतरी, धनत्रयोदशी आणि आयुर्वेद*
भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी सागरमंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. धन्वंतरी ह्यांना विष्णूचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते.
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात.
सुश्रुतसंहिता या सुप्रसिद्ध मूलभूत आयुर्वेद ग्रंथाचा कर्ता सुश्रुत हा आचार्य असून त्याला व त्याच्याबरोबर अनेक आचार्यांना मनुष्यरूपाने अवतरलेल्या काशीराज धन्वंतरी देवाने हा आयुर्वेद उपदेशिला, असे त्यामध्ये म्हटले आहेत. म्हणजेच सुश्रुतसंहिता हा धन्वंतरीचा आयुर्वेद आहे.
वर उद्धृत केलेल्या पुराणांमध्ये संक्षेपाने वा विस्ताराने समुद्रमंथनाची कथा आली आहे. त्या कथेचे तात्पर्य असे : अमरत्व प्राप्तीकरिता देव व दानव यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. मंथन करीत असता लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, चंद्रमा इ. चौदा रत्ने निघाली. त्यांपैकी एक धन्वंतरी देव हा होय. एका हातात अमृतकलश घेऊन हा देव प्रकट झाला.
*धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे आठ भाग*
(१) काय (शरीरविज्ञान), (२) बाल (बालवैद्यक), (३) ग्रह (भूतपिशाचादिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक), (४) ऊर्ध्वांग (शिरोभागात व तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक) (५) शल्य (शस्त्राघाताची चिकित्सा) (६) द्वंष्ट्रा (विषचिकित्सा), (७) जरा (आरोग्य वाढविणारे रसायन), (८) वृष (वाजीकरण).
धन्वंतरीच्या नावावर आणखी दहा–बारा ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्या प्राचीनतेबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही.
दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या (इ. स. ३७६–४१४) पदरी नवरत्ने होती, असे इतिहास सांगतो. त्यांपैकी एक धन्वंतरी होता. तो विद्वान कवी व वैद्यही होता. अकराव्या शतकातील भोज राजाच्या पदरी असलेल्या नवरत्नांमध्येही एक धन्वंतरी होता असे म्हणतात .