आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मुलींनी कराटे शिक्षणाचा उपयोग स्वसंरक्षणासाठी करावा- आ. राजू भैया नवघरे
रामु चव्हाण

वसमत/ रामू चव्हाण
वसमत शहरातील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय येथे आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन हिंगोली आणि हिंगोली कराटे असोसिएशन च्या वतीने हिंगोली येथे घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट व मेडल चे वाटप करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष बि.डी कदम सर तर प्रमुख पाहुणे वसमत विधानसभेचे कार्यकुशल आमदार राजू भैया नवघरे, वसमत शहर पोलीस स्टेशनच्या फौजदार प्रतिभाताई शेटे पत्रकार चंद्रकांत देवने, मारोतराव धोंडे ,इसाक पठाण, संजय बर्दापूरकर, रामू चव्हाण ,गजानन नवघरे, सुरज फेगडे प्राध्यापक बागल सर, प्रकाश इंगळे सर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार राजू भैया नवघरे यांनी मुलींना सक्षम आणि खंबीर बनून प्रतिकारक्षम केले गेले पाहिजे कराटे हे केवळ शिक्षणा पुरते मर्यादित न राहता वेळ आली तर त्याचा उपयोग संरक्षणासाठी कसा करावा याचे ज्ञान आत्मसात केल्यास मुलींना कुठलीही भीती राहणार नाही. आज पावलो पावली भयाचा काहूर माजलेला आहे घरातून बाहेर गेलेली मुलगी सुखरूप घरी परतेल की नाही असा मोठा प्रश्न पालकांसमोर असून जर मुलींनी कराटे केवळ शिक्षणा पुरतीच मर्यादित न ठेवता याचा उपयोग आत्मसंरक्षण साठी केला तर याचा फायदा समाजालाही मोठ्या प्रमाणात होईल यामुळे मुलींनी सुद्धा स्वरक्षणासाठी कराटे शिकले पाहिजे असे मत आमदार राजू भैया नवघरे यांनी मांडले.