शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर क्षिरसागर यांचा नांदापूरकर यांनी केला सत्कार
वसमत/ प्रतिनिधी
शिंदे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर शिरसागर यांची नुकतीच आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली. हे झाल्यानंतर वसमध्ये ज्येष्ठ पत्रकार पंकज नांदापूरकर यांच्या निवासस्थाने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मीकांत चव्हाण, बालाजी चव्हाण, जगदीश चव्हाण ,आनंदराव चव्हाण, प्रदीप चव्हाण ,संदीप चव्हाण ,गंगाधर चव्हाण, दिनेश कदम ,संजय टाक,तातेराव कदम ज्ञानेश्वर हरणे ,विष्णू चव्हाण ,प्रकाश शहाणे, गजानन शिरसागर ,शुभम खंदारे यांच्यासह शिवसेना युवासैनिक उपस्थित होते.