आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
पस्तीस वर्षांनंतर दहाविच्या विद्यार्थी आले स्नेह मेळाव्या निमित्त एकत्र
रामु चव्हाण

*गुरु आणि शिषांचा मिलन कार्यक्रम*
वसमत – रामु चव्हाण
वसमत जिल्हा परीषद प्रशाला हायस्कूलमधील १९८६-८७ च्या दहावीच्या बॅचने पसतीस वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले.
सगळे विद्यार्थी शिक्षकांसह प्रसाद गार्डन येथे दाखल झाले.
आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. तरीही वसमत हायस्कूलच्या १९८६-८७ च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल पसतीस वर्षांनी पुन्हा जागवल्या ‘एक दिवस हायस्कूलचा’ या उपक्रमाद्वारे. गेल्या काही महीण्याखाली वंदना सदावर्ते आणि गोपाळ किन्होळकर यांनी या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला रविवार, १४ नोव्हेंबर २०२१
गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.
त्या दिवशी सकाळपासूनच वसमतजि.प. हायस्कूलचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते. सर्वजण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले. शाळेत असताना व्हायची तशी परेड व्हायची तसीच प्रा.सिकंदर ढेंबरे यांनी विश्राम सावधान झाल्यावर राष्ट्रगीत आणि प्रार्थनासुद्धा झाली. त्यानंतर शाळेच्या जवळपास असलेले प्रसाद गार्डन साऱ्यांनी जमुन भेट घेतली. अगदी लहान होत तिथे संगित खुर्ची ,धिंगा मस्ती,जोक्स करुन आनंदही घेतला. मग शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर सारे एका हॉलमध्ये जमले. औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. वंदना सदावर्ते हिची मुलगी गौरी आणि सिध्दी धोंगडे यांनी भरत नाट्म गणेश वंदनेचे नृत्य सादर केले.उपस्थित नसलेल्या मुलांनी व्हिडीओ काॕलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.या वेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. फारोकोद्दिन उर्फ इरफान सिद्दीकी यांनी तर या सर्वांवर चांगलीच छाप पाडली. शिक्षकांनीही या बॅचच्या आठवणी जागवून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.
सर्वांनी बच्चेकंपनीसह गाण्यावर ठेकाही धरला.
या कार्यक्रमासाठी वंदना सदावर्ते ,संजवणी लहाणकर ,अरुणा घाटोळे ,गोपाळ किन्होळकर ,फारोकोद्दिन सिद्दीकी ,सुनिल वैजवाडे ,अशोक गुंडाळे ,प्रा.सिकंदर ढेंबरे,अजगर पटेल ,शे.अरशद , आदींनी मेहनत घेतली. गुरुजींच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या वेळी आपली ओळख करून देताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आश्वर्या भिसे हिने ‘मोहे रंग दो ना ….या गाण्यावर ठेका धरत एकत्र आले. तब्बल पसतीस वर्षांनंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच मधली सुट्टी झाली; आणि एकञ जमुन स्नेहभोजनाचा स्वाद घेतला.पण त्यानंतर शेवटचे तासही खेळण्या- कधी गेले ते कळलेच नाही. पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत जि.प.हायस्कूलचा तो एक अनोखा दिवस सरला होता.