राज्यातील सरपंच पदासह सात हजार 751 ग्रामपंचायत साठी 18 डिसेंबरला मतदार होणार असून यावेळी महाराष्ट्रातील सात हजार 751 ग्रामपंचायतच्या सदस्य पदांसह सरपंचाचे थेट निवडणूक जनतेतून होणार आहे.
18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी वसमत तालुक्यात आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी केली आहे.
वसमत तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक लागली असून यामध्ये 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे.तर 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 5 डिसेंबर 2022 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून , सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. व त्याचदिवशी निवडणूक चिन्ह हे वाटप होणार आहे तर 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे यावेळी वसमत तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी जनतेतून थेट निवड होणार आहे.
तर ग्रामपंचायत सदस्यांचे यावेळी निवड होणार आहे यावेळी उमेदवारी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आजच संपर्क साधा.
विश्व झेरॉक्स मल्टीसर्विसेस,ग्रामीण पोलीस स्टेशन समोर,नविन तहसील कार्यालया जवळ,कात्नेश्वरकर कॉम्प्लेक्स वसमत
मो.9595323227
8983323227
या आहेत वसमत तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती