आपला जिल्हाराजकीय
शिवसेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
शिवसेनेचे शहर प्रमुख काशिनाथ भोसले पाटील यांचा 15 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले यांचा वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून यानिमित्त शहरात विविध प्रभागांमध्ये त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.
यामध्ये नेत्र तपासणी शिबीर व चष्म्यांचे वाटप तसेच नागरिकांचा अपघात विम्याचे वाटप, शालेय साहित्य तुला, मोंढ्यातील हमाल मापाडी यांना टीशर्ट व मास्क चे वाटप,महिला सफाई कर्मचारी यांना साडीचोळी चे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच वसमत तालुक्यात ज्यांनी शिवसेना वाढवली शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायतीपासून वसमत विधानसभेवर फडकवला त्यासाठी तन-मन-धनाने काम करणारे आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सत्कार प्रथमच वसमत शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.