
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील सर्व शिवभक्तांना कळविण्यास आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसमत येथील शिव उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा सर्वांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येत आहे…. शुक्रवार दि. 18/02/2022 रोजी सायंकाळी ठिक 6:00 वा. विद्युत रोषणाई, आकर्षक आतीषबाजी व ढोल ताश्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन होणार आहे…. तसेच शनिवारी दि. 19/02/2022 रोजी सकाळी 10:00 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त देखील पुजन करण्यात येणार आहे……
तरी या भव्य सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा समिती वसमतच्या वतीने करण्यात आले आले.