आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय

लिटल किंग्ज शाळेची दुसरी माळ समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांना

रामु चव्हाण

नवरत्न मालिका

*लिटल किंग्ज शाळेची दुसरी माळ ….
“”””””””””””””””””””””””””””””””””””””

समाजसुधारक सावित्रीबाई फुले …..
यांना 🌱💐
*
“””””””””””””””””””””””””””””””

*सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत.*

या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.

मुलींची पहिली शाळा
“””””””””””””””””””””””””””””
– First School For Girls in India
———————————;

सावित्रीबाईंनी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत

सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.

ज्योतिबांनी केले शिक्षीत –
“””””””””””””””””””””””””””””””””””

त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांच्या परिवाराने फार विरोध केला.
जुन्या चालिरीतींचा पगडा आणि समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती.
या करता सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि या रूढी ला तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या सहाय्याने 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली. ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. आणि अश्या त.हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या.

सावित्रीबाई म्हणायच्या: वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका जा आणि शिक्षण प्राप्त करा!
सवित्रीबाईंची त्याकाळी समाजाकडुन होणारी अवहेलना:
पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.
सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.
अनेक शाळांची निर्मीती:
पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.
महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.

अशा थोर
दुसरे नवरत्न
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नवरात्रीनिमित्त लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल , वसमत . ता वसमत .जि हिंगोली , च्या इयत्ता ८ वी आणि इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनीच्या वतीने मानाचा मुजरा आणि दुसरी माळ ——.!!
💐🌱

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!