आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र
महिला मुलींच्या सुरक्षेसाठी जननी स्तुत्य उपक्रमाची वसमत शहरात सुरूवात
रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण
जननी कार्यक्रमाच्या माध्यमातून कायद्याची माहिती गावागावात पोहोचून स्त्रियांना सक्षम करण्यात येणार आहे. हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असून या उपक्रमांची सुरुवात वसमत शहरात झाली आहे.
आज वसमत शहरातील आंबेडकर नगर व पावरलूम येथे जननी या स्तुत्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी वसमत शहरातील पोलिस कर्मचारी होमगार्ड महिला व शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या
हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा व अत्याचार प्रतिबंधाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृतीसाठी जननी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला व मुलींवर होणारे अत्याचार हे सहशीलता संपल्यानंतर ती मरते. त्यामुळे मुलींनी व महिलांनी स्वत:हून घडलेल्या प्रकाराची माहिती घरी किंवा पोलिसांना देणे गरजेचे आहे. यासाठी आई, शिक्षिका आणि शासकीय यंत्रणा यांची महत्वाची भूमिका आहे, असे मत पोलीस कर्मचारी भगीरथ सवंडकर यानी सांगितले.
वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन वसमत शहरातील हद्दीत जननी महिला सक्षम समाज अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती हि त्यांनी दिली.
आज या कार्यक्रमातून स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार, नाबालिक, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृध्द महिला व बालकांचे लैंगिक शोषण, मानसिक व आर्थिक शोषण, अत्याचार पिडित महिला आदींची जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी भगीरथ सवंडकर,कृष्णा चव्हाण,धुर्वे, महिला पोलिस कर्मचारी मरापे, होमगार्ड काबळे,शेख आदिनी परिश्रम घेतले.