आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
स्व.अंजानी किरवले यांना कर्तृत्ववान महिला नारी पुरस्कार
वसमत / रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणच्या पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी हौसाजी किरवले यांंनी त्यांच्या मातोश्री अंजानी हौसाजी किरवले
आईच्या नावाने दोन वर्षा पूर्वी एक बहुद्देशीय सेवाभावी संस्था सुरू केली – अंजानी फाऊंडेशन.
फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू , गोर गरीब, वयोवृद्ध, दिव्यांग, मनोरुग्ण, रस्त्यावरील लोकांसाठी हि संस्था मासिक किराणा सामान देते
फाऊंडेशन मार्फत विविध उपक्रम राबविले जातात –
-दिवाळी उपक्रम
-हिवाळी उपक्रम
-पावसाळी उपक्रम
-उन्हाळी उपक्रम
-मासिक अन्नपूर्णा किराणा कीट वाटप
-आरोग्य शिबीर, नेत्र शिबीर
अनेक उपक्रम फाऊंडेशन मार्फत राबविले जातात.
अंजानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल मनुष्यबळ लोकसेवा अकादमी यांनी घेतली असून स्व.अंजानी किरवले यांना कर्तृत्ववान महिला नारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा वारसदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांनी हा पुरस्कार मुंबई या ठिकाणी अंजानी फाऊंडेशन टीम च्या वतीने स्वीकारला.
यावेळेस बोलताना स्व.अंजानी फाऊंडेशन चे बालाजी किरवले म्हणाले की, आई हयात नसतांना देखील आज माझी आई फाऊंडेशनच्या माध्यमातुन पुरस्काराची मानकरी झाली…व आमच्या कार्याची दखल घेणार्या लोक सेवा अकादमीचे आम्ही खूप खूप आभारी आहोत असे आभार मानले.