आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
गोदावरी फाउंडेशन,हिंगोलीने घेतली महिलांची आरोग्यविषयक कार्यशाळा
रामु चव्हाण

हिंगोली: रामु चव्हाण
गोदावरी फाउंडेशन,हिंगोलीच्या वतीने ‘महिलांचे आरोग्य आणि पाळीच्या काळातील समस्या व स्वच्छ्ता’ या विषयावर प्रशिक्षिक डॉ.स्वाती गाडगीळ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन झूमलिंक द्वारे ऑनलाइन करण्यात आले होते.
गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी सध्या महिलांना होणारा गर्भशयाचा कर्करोग आणि त्या संबंधित आजारच प्रमाण नजीकच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.याची दखल घेत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष राजश्री पाटील यांनी आरोग्य कार्यशाळेचे आयोजन केले होते.महिलांची आरोग्य महत्त्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी या विषयीची जनजागृती व्हावी या उद्देशाने गोदावरी फाउंडेशनच्या वतीने “महिलांचे आरोग्य आणि पाळीच्या काळातील समस्या व स्वच्छता” या विषयावर डॉ.स्वाती गाडगीळ यांचे झूम लिंक द्वारे ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.व्याख्यात्या डॉ.स्वाती गाडगीळ भूलतज्ञ असून गेले तीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.त्या उत्तम लेखिका आहेत.स्त्री पुरूष समानता खऱ्या अर्थाने कशी असावी हा त्यांचा आवडता विषय आहे. या विषयावर त्यांनी ७०० हून अधिक व्याख्याने राज्यभर दिली आहेत.
या कार्यशाळेत डॉ.स्वाती गाडगीळ यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलीं ज्यांची नुकतीच पहिली मासिक पाळी सुरू झालेली असते,त्यांच्या मनात प्रश्नांची शृंखला निर्माण झालेली असते .एक प्रकारे भीतीचे वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण होते.कारण आपल्याकडे अजून देखील या विषयी उघडपणे बोलले जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या विषयाबद्दलचे अज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होत असतो . या मुलींना त्यांच्या आईंनी मैत्रिणी सारखं समजून सांगणं खूप गरजेचे आहे.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे.जेणे करून त्यांचे अज्ञान दुर होऊ भीती कमी होईल.महिलांनी मासिक पाळी दरम्यान घरगुती कपड्याचा वापर न करता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या हायजीनिक सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा. या दरम्यान अनेक महिलांच्या ओटी पोटात त्रास होत असतो, त्यावर घ्यावयाची काळजी यावर प्रशिक्षक डॉ. स्वाती गाडगीळ यांनी सखोल मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस गोदावरी फाउंडेशनच्या महिलां सदस्यांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदविला आणि त्यांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. स्वाती गाडगीळ,अध्यक्ष राजश्री पाटील, फाउंडेशनचे सचिव धनंजय तांबेकर यांचे आभार मानले.