स्था.गु.शाखेची मोठी कारवाई 7 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त
वसमत/ रामु चव्हाण
हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या यामध्ये हिंगोली , सेनगाव, गोरेगाव, औंढा नागनाथ, वसमत अशा पोलीस ठाण्यांमध्ये जनावरे चोरी जाण्याच्या घटना दाखल असून ही जनावरे चोरी करणा-यानी य पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. यावेळेस हिंगोली चे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरील गुन्ह्याचा टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले असता हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने या बद्दल गोपनीय रित्या माहिती घेऊन सायबर सेलच्या मदतीने गुन्हे करणारी टोळी ची माहिती घेतली असता नांदेड शहर व भिवंडी शहरातील आरोपींनी मिळून हे जिल्ह्यातील गुन्हे जनावरे चोरी करण्याचे गुन्हे केले असल्याची माहिती मिळाली .असता स्थानिक गुन्हे शाखेने मोहम्मद अहमद मोहम्मद हुसेन राहणार मदिना नगर नांदेड व त्याचे साथीदार मोहम्मद ताहेर मोहम्मद इक्बाल राहणार मिन्नत नगर नांदेड ,साबेर लालडेसाब शेख राहणार भिवंडी यांच्याकडे तपास केला असता त्यांनी नमूद जनावरे चोरीचे गुन्हे त्यांचे इतर तीन साथीदार इसाक कुरेशी राहणार दांडेकरवाडी ठाणे, अंसारी यातीफुर रहमान शोएब यातीफूर रहमान रहमान दांडेकर वाडी ठाणे, शेख सलीम राहणार कल्याण यांच्यासोबत मिळून त्यांतील भिवंडी येथील सहभागी चार आरोपी हे गुन्हे करण्यासाठी भिवंडी येथून नांदेड येथे रेल्वेने येत होते व आरोपी क्रमांक एक मुख्य आरोपी यांच्यासोबत मिळून जनावरे चोरीचे गुन्हे करून चोरून नेली जनावरे यातील आरोपी क्रमांक एक यास विकुन यांचा आरोपी क्रमांक एक हा सदर चोरी केलेली जनावरे कापून विक्री करत होता या गुन्ह्यातील जनावरे चोरून त्यातून मिळालेले पैसे आपसात वाटून घेत होते असे आरोपीतानी सांगितले असता या प्रकरणी हिंगोली शहर, सेनगाव पोलीस स्टेशन ,औंढा नागनाथ पोलीस स्टेशन ,गोरेगाव, वसमत ग्रामीण पोलीस टेशन येथे पोलिस स्थानकांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल विचारले असता सदरील गुन्ह्याची कबुली आरोपीतानी दिली आहे .जनावरे चोरीचे केल्याचे गुन्हे दाखल असून आरोपीकडून तपासादरम्यान गुन्ह्यात जनावरं चोरून विक्री करून मिळालेली रक्कम रुपये दोन लाख 30 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकप वाहन पाच लाख रुपये ,आरोपी त्यांचे तीन मोबाईल 18 हजार रुपये असा एकूण सात लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यात नांदेड व परिसरातील जनावरे चोरीचे गुन्हे केल्याचे हे आरोपी त्यांनी सांगितले असून यामुळे नांदेड परभणी सह मराठवाड्यातील जनावरे चोरी करणारी टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ,सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख ,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि राजेश मलपिललू ,सपोनि सुनील गोपिनवार, फौजदार भाग्यश्री कांबळे, पोलीस अमलदार बालाजी बोके ,संभाजी लेकुळे ,भगवान आडे, किशोर कातकडे, राजूसिंग ठाकूर, किशोर सावंत, विठ्ठल काळे, आकाश टापरे ,ज्ञानेश्वर सावळे ,सुमित टाले, शे जावेद ,तुषार ठाकरे व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी सदरील कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.