
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुका हद्दीतील कानोसा शिवारात इसापूर धरणाच्या कॅनॉल मध्ये आज एक पुरुष जातीचे प्रेत वाहत आले असून ते अर्धवट सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहे .या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस स्टेशनचे सपोनि गजानन मोरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सदरील प्रेत कॅनल मधून बाहेर काढण्यात आले असून सदरील प्रेताचे वय अंदाजे वीस ते तीस वर्षांच्या जवळपास असून अंगावर आदिदास कंपनीचे टी-शर्ट कानामध्ये पिवळ्या रंगाची बाळी असून सदरील इसमास कोणी ओळखीचे असल्यास किंवा कुठल्याही पोलिस स्टेशन मध्ये मिसींगशतक्रार दाखल असल्यास कुरुंदा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी केले आहे.