
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील रुखी या गावाजवळ कॅनॉलमध्ये दिनांक 5 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास एका 38 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. त्या संबंधित माहिती हट्टा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आली असताना सदर इसम हा रुखी शिवारात असलेल्या महादेव मंदिराच्या कॅनॉलमध्ये वाहत आला असून सदरील इसमाची ओळख पटलेली नव्हती.

सदरील इसमहा ज्ञानेश्वर सखाराम गव्हाणकर वय 38 वर्षे राहणार हिंगणी तालुका जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून त्यांना दोन एकर शेती आहे ते लाईट फिटिंग फिटिंग चे काम करत असून ते दिनांक 3 जून रोजी परभणी येथे फिटींग च्या कामासाठी गेले असताना दिनांक 4 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते परभणी येथून निघाले आणि जवळाबाजार येथे आले असताना रात्री 9-30 वा
नातेवाईकांनी फोन केला असता अर्ध्या तासामध्ये मी औंढा येथे पोहोचतो असे म्हणून त्यांचा फोन त्याच ठिकाणी बंद झाल्याची माहिती आहे.
नातेवाइकांनी त्यांच्या फोनवर बराच संपर्क केला पण संपर्क काही होऊ शकला नाही सकाळी दिनांक 5 जून रोजी त्यांनी परत परभणी औंढा या ठिकाणी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा काही शोध लागला नाही.




