आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय
आमदार राजुभैय्या नवघरे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता
रामु चव्हाण

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे चार उमेदवार विजयी
वसमत / रामु चव्हाण
आ.राजुभैया नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,डाॅ.जयप्रकाश मुंदडा यांच्या महाविकास आघाडी पॕनलचा दणदणीत विजय
शेतकरी विकास पॕनलचे 13 तर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समीती बचाव पॕनलचे 4 तर 1 अपक्ष निवडून आले.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे दुसरीकडे शिंदे व भाजपा गटास काही जागांवर समाधान मानावे लागले
व्यापारी मतदारसंघात अपक्ष उमेदवार झंवर विनोदकुमार भगवानदास मताधिक्याने विजयी झाले.
कृषी उत्पन्न बाजार समीतीवर आमदार राजुभैय्या नवघरे निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे. राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोग कृ.उ.बा.समीती वसमत मध्येही यशस्वी झाला आहे.
मतदारसंघाची निवडणूक रविवारी (२५ डिसेंबर ) रोजी पार पडली. यात एकूण ३०३५ पैकी २९७१ मतदान ९७.८९ टक्के मतदान झालं.
. या निवडणुकीत आमदार चंद्रकांत ऊर्फ राजुभैया नवघरे यांचासह माझी सभापती तानाजी बेंडे यांची प्रतिष्ठा लागली होती.
आ.राजुभैया नवघरे यांचे १३
तर इंगोले गणेश निरंजनराव यांच्या पॕनलचे ०४ तर अपक्ष ०१ उमेदवार निवडून आले.
यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चार उमेदवार दणदणीत विजयी झाले यामध्ये संभाजी बेले, वैजनाथ भालेराव, रमेश दळवी,गणपतराव तागडे हे विजयी झाले.
यावेळी वसमत शहरातून विजयी उमेदवारांचे भव्य मिरवणूक काढण्यात काढण्यात आली यावेळी महाविकास आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे, ज्ञानदेव डुकरे, दुधमल, सचिव शिंदे, गोपाळ भोसले,संतोष पतंगे,सुर्यवंशी, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
विजय झालेले उमेदवार व त्यांना मिळालेले मते खालील प्रमाणे आहे