
वसमत/ रामु चव्हाण
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या हिंगोली जिल्ह्याला नवचैतन्य निर्माण करण्यासाठी नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून बबनराव थोरात यांची निवड झाली.
महाराष्ट्रातील ज्या काळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना एकमेव जिल्हा परिषद यांनी शिवसेनेच्या ताब्यात दिली असे शिवसेनेचे तत्कालीन संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांची नुकतीच हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी पुनश्च एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केल्याचे आज दैनिक सामना या वृत्तपत्रातुन जाहीर करण्यात आले आहे.
एक सच्चा शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून बबनराव थोरात यांची ओळख संपूर्ण हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असून साध्या शाखाप्रमुखांपासून ते एका कार्यकर्त्यांपर्यंत तोंड पाठ नाव असणाऱ्या शिवसैनिकाला ओळखण्याची किमया आणि त्याच जोमाने पक्षाचे काम आधी तळागाळा पोहोचवणारा संपर्कप्रमुख म्हणून बबनराव थोरात यांच्याकडे पाहिल्या जाते त्यांच्या कामाची दखल घेत आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेच्या हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पद नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे