आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

श्री पाद्देश्वर शिवाचार्य महाराज राजकारणात येणार का ? प्रस्थापित व्यवस्थे विरोधात खोचक लेख व्हायरल चर्चेला उधाण..

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत तालुक्यात राजकारणामध्ये गिरगाव येथील मठाधिपती श्री पादेश्वर शिवाचार्य महाराज राजकारणामध्ये येणार का अशा प्रकारच्या चर्चा व पोस्ट सध्या वसमत तालुक्यामध्ये फिरत आहे या पोस्टमध्ये वसमत तालुक्यातील एका जागरूक नागरिकांनी काय मत व्यक्त केला आहे ते आपण पाहूया

 

हजारो कार्यकर्त्यांच्या जीवावर शेकडो नेत्यांनी कोट्यावधी रुपये कमावले
परंतु
आज पहिल्यांदा राजकारणात असा चेहेरा येतोय ज्यांच्या अंगावरील कपडे देखील जनतेने दिलेले आहेत त्याला कुठल्याही उत्पनाची अपेक्षा नाहीये.

तो खादीचे कपडे घालत नाही तो स्टार्चचे कपडे घालत नाही
त्याला कुठलाही अपेक्षा, स्वार्थ नसताना तो अचानक पणे राजकारणात का येतोय हा प्रश्न पडणे सहाजीकच.

1)गेल्या 3वर्षात तब्बल 50ते 60 कोटी रुपयांच्या मठ मंदिरराच्या जमिनीवर बनावट कागदपत्र बनवत अतिक्रमण करून ती जमीन काबीज केली सर्व राजकीय नेत्यांची अंतरआत्मा झोपी गेली कुणीही काहीही बोलला नाही हिंदुत्वाच्या नावावर काहीक दशक राजकारण करणारे सामन्य घरचे पोर ते अब्जाधीश असा प्रवास असलेले नेते त्यांची पण अंतरात्मा गाढ झोपी गेली यावर कुणीही काहीही वाच्यता करायला तयार नाही यावरून सर्व तालुक्यातील नेत्यांवर संशय येण साहजीकच इथे मठ मंदिरच सुरशित संरक्षित नाहीत तिथे सामन्य माणसाने स्व कष्टाने जीवनाची जमा पुंजी लाऊन कमावलेल्या प्लॉट किंवा जमीन कब्जा हा तर मामुली आणि शुल्लक गोष्ट

2)ईलेक्शन प्रत्येक 5वर्षात येतात जनसामान्य लोकाना वाटते परंतु असे नाही कधी लोकसभा कधी विधानसभा तर कधी नगरपालिका ,ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद परंतु सोबतच एक तरुण पिढी प्रत्येक वर्षी प्रकाशात येत असते या तरुण वर्गाला राजकीय पुढाऱ्यांन विषयी आकर्षण असत ह्या आकर्षणाचा फायदा घेत नेते स्वतःचा डाव साधत त्यांना व्यसनांच्या खोल दरीत ढकलत स्व स्वार्थ साधत असतात हे मी गेली कितेक दशक पाहतोय हे चित्र कधी बदलणार गेल्या नगरपालिकेला तर मी चक्क 14 15 वर्षांचे तरुण हातात पोल चीट गळ्यात शेला घेऊन पहिले ज्याना मतदानाचा हक्क देखील नाही असे बाल अवस्तेतील तरुण पण याला अपवाद नाहीत

3)असा म्हणतात लोकशाहीत खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदश्य,नगरसेवक हे वेतनभोगी सेवक आहेत परंतु वास्तविक परिस्थिती या विपरीत आहे ह्या सर्व पुस्तकिय भंपक गप्पा आहेत असी परिस्तिती आज आपण पाहतो याला सर्वस्वी जबाबदार कोण?

4)लोकशाहीत मतदार हा राजा आहे नेते हे याचक आहेत त्याना मतदान (दान म्हणजे भिक्षा,भीक) मागतात निवडणुकीत त्याना मतदार राजा म्हणून संबोधतात निकालानंतर हि परिस्तिति बदलते हे आम्ही गेली पाचदशक पाहतोय पाश्चिमात्य देशात नेत्याना जास्त महत्व दिलं जात नाही तेथील राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ संपल्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी एखाद्या दुकानात काम करताना आपण पाहिलंय त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बराक ओबामा आपल्याकडे कुणी एक वेळा निवडून येतो आणि अब्जाधीश होतो आणि चार पीढ्या त्या नावाने मिरवतात

5)सामान्य तरुण तब्बल 2363 पत्र त्याना तुम्ही विधानसभा निवडणूक लढावा म्हणत पत्रव्यवहार करतात आणि स्व खर्चाने पदरची भाकरी खाऊन पदरचे पेट्रोल खर्च करून प्रचार करू असा शब्द देतात म्हणेज नक्कीच त्यांच्यात सेवाभाव असेल असी अशा बाळगतो नक्कीच तरुणाई एका संन्याशाला न्याय देईल अशी अशा बाळगतो आणि नवीन क्रांती होऊन निस्वार्थ भावाने तरुण निवडनुकिकडे पाहतील आणि व्यसनमुक्त निवडणूक होऊन सक्षम युवा निर्माण होऊन चित्र बदलेल हिच अपेक्षा

6)लोकशाहिचा चौथा स्तंभ भली मोठी जाहिरात पेड केल्याशिवाय लेख घेत नाही हे आम्हास ज्ञात आहे त्यामुळे आम्ही लिखाणाचा समाजमाध्यमांवर पर्याय म्हणून थोडा सत्यता मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला*

नवीन संन्याशी चहेरा येऊन हि परिस्तिति बदलेल हिच अपेक्षा.

एक जागरूक मतदार वसमत तालुका अशा प्रकारची पोस्ट वसमत तालुक्यासह जिल्हाभरामध्ये व्हायरल झाल्यामुळे चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!